गारठलेला पाऊस, झाडाच्या पानापानात लपतो..
त्यावेळी तू मात्र आपल्या केसांत पाऊस माळत असतेस..
सारेच शोधतात आडोसा.. दोन क्षण उभे राहण्यासाठी..
ओलेती पंख पसरत, पाखरेही विसावतात..
तुझी पावलं मात्र थरकत.. बेधुंद होऊन पाऊस वेचायला धावतात..
ओल्या मातीत पाऊल रुतवत तू चालत राहतेस..
स्वतःसाठी.. स्वतःपुरती..
सार काही विसरून.. दोन हात पसरून.. तू सादवतेस थेम्बाना..
वाटत.. थेंब होऊन तुझ्या गालांना ओलावत जाव..
मातीचा धुंद गंध श्वासांना उदवतो.. मातीचा ओलावा हिरवेपण उजवतो..
मातीची कूस उजवते.. दवाची ओल मन भिजवते..
मी मात्र पाहत राहतो.. निशब्द..
एकदा तुझ्याकडे.. एकदा नभाकडे..
तू ही तृप्त.. तो ही तृप्त..
तू नखशिखांत भिजलेली.. भिजलेल्या डोळ्यात पावसाची स्वप्न सजलेली..
तो असा रिता रिता.. ओंजळ मात्र भरलेली.. सांडून ही न सरलेली..
स्वप्नाली..
1 comment:
छान कविता आहेत
Post a Comment