Thursday, April 12, 2012

पाउस वेडी..

धुंद पिसाट वारा सुटतो.. लाजाळू हि अलगद मिटतो..

गारठलेला पाऊस, झाडाच्या पानापानात लपतो..

त्यावेळी तू मात्र आपल्या केसांत पाऊस माळत असतेस..



सारेच शोधतात आडोसा.. दोन क्षण उभे राहण्यासाठी..

ओलेती पंख पसरत, पाखरेही विसावतात..

तुझी पावलं मात्र थरकत.. बेधुंद होऊन पाऊस वेचायला धावतात..



ओल्या मातीत पाऊल रुतवत तू चालत राहतेस..

स्वतःसाठी.. स्वतःपुरती..

सार काही विसरून.. दोन हात पसरून.. तू सादवतेस थेम्बाना..

वाटत.. थेंब होऊन तुझ्या गालांना ओलावत जाव..



मातीचा धुंद गंध श्वासांना उदवतो.. मातीचा ओलावा हिरवेपण उजवतो..

मातीची कूस उजवते.. दवाची ओल मन भिजवते..

मी मात्र पाहत राहतो.. निशब्द..

एकदा तुझ्याकडे.. एकदा नभाकडे..

तू ही तृप्त.. तो ही तृप्त..

तू नखशिखांत भिजलेली.. भिजलेल्या डोळ्यात पावसाची स्वप्न सजलेली..

तो असा रिता रिता.. ओंजळ मात्र भरलेली.. सांडून ही न सरलेली..


स्वप्नाली..

Tuesday, August 3, 2010

Our home..

What do you choose to acknowledge n feel?

Delight that fills you completely?

or

Anguish that lasts forever..

Life is all about what you choose to feel.. so choose to feel the delight.. even though it lasts for few minutes..

Our home.. :) Congratulations to Kaustubh n Swapnali.. I term this as a start for a better life together.. Stay happy.. :)

Friday, July 30, 2010

Start of a new journey..

Till date.. I used this space to save my creations.. :) mazya kavita..

Henceforth.. it will also be a place to save my sorrows.. happiness.. thoughts.. opinions.. n whatever..

The thought of writing diary is getting compelling day by day.. don know what exactly triggered this thought.. but it seems i have to write.. maybe just for myself.. just to put the feelings in words.. like a repository of one's own experiences.. just for me.. so that i can go back in time.. turn the pages back n re-live the whole moment once again..

Ill ask certain questions to myself n will answer them for me..

Welcome to the world of Me.. n Myself..

Friday, January 29, 2010

कदाचित माझेही..

तुझ्या पहील्या पावसाच्या.. पहील्या सरीचा.. पहीला थेम्ब होउन..
तुझ्या गालावरुन ओघळू दे मला.. ओली रेघ उमटवत..
पाहू देत.. अवचित त्या स्पर्शाने.. तुझ्या अन्गभर उठलेल काट्याच वेड रान..

रस्त्याच्या कडेवरचा.. एकटाच निवडुन्ग होतो मी..
स्वतःच्याच धुन्दीत हळूच तू ये..
कट्यात गुन्तू दे रेशमाचे अलवार धागे.. लागु दे ओढ तुझ्या पदराला..
पाहू दे.. तुझ्या डोळ्यात अजाणता उमटणारी, भितीची अस्पश्ठ सावली..

नाहीतर होतो मी, तुझ्या घराचा निःशब्द कोपरा..
कणाकणात जाणवत रहाणार तुझ अस्तित्व..
तुझे श्वास न उःश्वास ही..
पाहू दे.. कधीतरी भर उन्हाच्या पारी, समोरचा गुलमोहर न्याहाळताना, अनाहूत हसणारया तुझ्या पापण्या..

असच एकदा व्हायचय मला..
खारया पाण्यात खेळणारया तुझ्या पायाखालची रेत..
कधी तू हातात घेशील याची वाट पहात बसेन..
जवळ असेल तो तुझ्या हाताचा तो निसटता स्पर्श..
पाहू दे.. गळ्यात माळलेली शिम्पली.. पायातल्या घुन्गराचा सुक्श्म नाद.. उजळ उन्हात उभी.. सावळी तू..

काळोख्या एका रात्री.. निशीगन्ध होतो मी..
गन्धात न्हाउन तू, हळूवार जवळ ये.. चान्दण झरु दे तुझ्या गात्रातून..
पाहू दे.. तुझ्या तहानलेल्या डोळ्यात माझ प्रतिबीम्ब..
ऐकु दे.. तुझ्या ओठानी घेतलेल माझ नाव..
स्पर्शु दे.. तुझ्या हाताची अस्वस्थ थरथर..
कळु दे.. तुझ्या उतावीळ जाणिवेत माझी ओढ..

हे.. आणि असे कीतीतरी.. क्शण.. जे तुझे एकटीचे.. पण कदाचित माझेही..

क्वचितच कधीतरी..

तू हवा होतास.. अगदी खर आहे.. पण तू नाहीस.. तर बिघडत कुठे?


कधी कधी फक्त.. आभळ अस दाटुन येत..
अचानक, अनाहुत, आसवान्च येण होत..
क्शण असा निघुन जातो.. मी मात्र थाम्बलेली..
पुन्हा परत येताना, श्वासही उसवत जातो..

क्वचितच कधीतरी.. पण अस होत खर..

अन्श..


उन खिडकीतून हळुच डोकावायच..

aanii तुझी पावल खिडकीकडे वळायची..

unhaache कवडसे तू ओन्जळीत वेचत रहायचीस..

aataa सान्ज कलल्यावरही, उन्ह खिडकीतच रेन्गाळताहेत..

tujhyaa एका स्पर्शासाठी..

आठवत मला.. पहील्या पावसात तुझ चिम्ब भिजण..

बरसत्या थेम्बान्त, तुझ्या केसान्च सजण..

डोळ्यात साठलेले ते क्शण, आता डोळ्यातुनच पाझरतात..

पहाटेचा गारवा मिठीत कवटालु पहायचीस..

दव पायात येउ नये म्हणुन पण जपायचीस..

दवाच हलवेपण आता उगीचच दुखवुन जात..

माझ्या पायी रुतला काटा, काढताना रडली होतीस..

आता मी काट्यातूनच चालत जातो, जखमाना झेलत, हळहळण्यासाठी तरी तू येशिल म्हणुन..

तुला हव होत एक घर.. माडाच्या गर्द राइतल..

दारात उभ राहुन तुला, निसर्गाच जिवन्तपण अनुभवायच होत..

आता त्या घराचा निशब्द कोपराही.. ताटकळतोय.. तुझ्या एका चाहूलीसाठी..

तु हसायचीस.. वाहत्या पाण्यासारख.. ती खळखळ अजुन कानात घुमते..

तुझ्या मिठीची उब अजुन अन्गभर खेळते..

तुझ्या केसान्तला मोगरा अजुन आसपास दरवळतोय..

तुझ्या केसान्तला ओलावा अजुन हाताना ओलावतोय..

सार काही जिथल्या तिथे..

फक्त तू नाहीस..

हातातला तुझा हात, कधीतरी सुटुन गेला..

मन्दावलेला तुझा श्वास, केव्हातरी विझुन गेला..

आता उरलीत स्वप्न.. तुझ्या निश्प्राण डोळ्यातली..

तुझ्या स्वप्नान्चा अन्श च आता उरलाय..

तो मी माझ्या डोळ्यात जीवापाड जपलाय..

आता माझ्या डोळ्यानी, तुझी स्वप्न पाहीन..

स्वप्नामधे कुठेतरी, तुला शोधत राहीन..

Thursday, January 28, 2010

बाहुली..

अनोळखी वाटानी..
सार आयुष्य भेलकान्डत राहिल..
दिशाहीन..
रक्ताललेली स्वप्ने मरणासन्न अवस्थेत..
अत्रूप्त अव्यक्त..
तू जवळ हवा होतास..

कितीतरी स्वप्न.. खरच मी पाहिली होती..
खरी व्हावीत अशा आशेने नाही.. पण.. भास म्हणुन का होइना, तू सोबत असावास म्हणुन..
तू खरच मला हवा होतास..

मी अशीच जगले..
तोन्डी रन्ग फासल्या बाहुलीगत..
रन्गाच्या पडद्याआड, 'माझ असण' लपवुन टाकल..
मी हसले.. जग हसल.. माझ्यासोबत रडल पण..
पण फक्त खेळापुरत..
'दोन पैशाचा तमाशा' पहाणारे सगळे पुतळे.. घरी जाउन सुखात निजले..
हसर्या डोळ्यात झरणारे दुक्ख.. कधी कुणाला कळालच नाही..
रडायला तुझा खान्दा हवा होता..

सारी वादळ, हसत मी पेलली असती.. तू नुसता हात धरला असतास तरी..
गुदमरलेली स्वप्ने पुन्हा एकदा फुलली असती.. तुझ्या एका स्पर्शाने..
आयुष्याची सान्ज कलेपर्यन्त, आसवान्शी ही लढले असते..
एका शब्दाने तरी म्हणायच होत.. "मी सोबत आहे" म्हणुन..

आता.. स्वताला समजावन्यासाठी तरी शब्द कुठून आणू?

Thursday, July 12, 2007

सचेतन..

अनादि मी.. अनंन्त मी..
सचेतन.. जीवन्त मी..

स्थिर सागरपरि.. अव्यक्त काहुर मी..
स्रुजनशिल गर्भतिल.. अस्पर्श चाहुल मी..

ग़ुदमरत्या श्वासातिल.. स्पर्शाची ओढ मी..
अस्पर्श.. कातर.. अशांत.. गुढ मी..

निसरड्या वाटेवर.. थरथरते पाउल मी..
ओठना भिजवत्या.. ओठांची ओल मी..

कोसळत्या धारांत.. धगधगति आग मी..
निद्रिस्त स्वप्नांना.. आलेली जाग मी..

एकाकी वाटेची.. साद एक आर्त मी..
एक थेम्ब झेलु दे.. श्रान्त मि त्रुशार्त मी..

श्वासांत झीरपता.. रानाचा गन्ध मी..
ऊन्मत्त.. उसळती.. लाट बेबन्द मी..

निर्जिव फ़त्तरात.. अवतरति जलधारा मी..
अंगभर शिरशिरि.. पिसाटलेला वारा मी..

काळोख्या रात्रीची.. धुसर धुन्द पहाट मी..
कधी एकटी.. दिशाहीन.. भरकटणारी वाट मी..

पाण्यावर वाहता.. उन्हाचा तवंग मी..
स्वतःतच हरवलेली.. स्वतःतच दंग मी..