तुझ्या पहील्या पावसाच्या.. पहील्या सरीचा.. पहीला थेम्ब होउन..
तुझ्या गालावरुन ओघळू दे मला.. ओली रेघ उमटवत..
पाहू देत.. अवचित त्या स्पर्शाने.. तुझ्या अन्गभर उठलेल काट्याच वेड रान..
रस्त्याच्या कडेवरचा.. एकटाच निवडुन्ग होतो मी..
स्वतःच्याच धुन्दीत हळूच तू ये..
कट्यात गुन्तू दे रेशमाचे अलवार धागे.. लागु दे ओढ तुझ्या पदराला..
पाहू दे.. तुझ्या डोळ्यात अजाणता उमटणारी, भितीची अस्पश्ठ सावली..
नाहीतर होतो मी, तुझ्या घराचा निःशब्द कोपरा..
कणाकणात जाणवत रहाणार तुझ अस्तित्व..
तुझे श्वास न उःश्वास ही..
पाहू दे.. कधीतरी भर उन्हाच्या पारी, समोरचा गुलमोहर न्याहाळताना, अनाहूत हसणारया तुझ्या पापण्या..
असच एकदा व्हायचय मला..
खारया पाण्यात खेळणारया तुझ्या पायाखालची रेत..
कधी तू हातात घेशील याची वाट पहात बसेन..
जवळ असेल तो तुझ्या हाताचा तो निसटता स्पर्श..
पाहू दे.. गळ्यात माळलेली शिम्पली.. पायातल्या घुन्गराचा सुक्श्म नाद.. उजळ उन्हात उभी.. सावळी तू..
काळोख्या एका रात्री.. निशीगन्ध होतो मी..
गन्धात न्हाउन तू, हळूवार जवळ ये.. चान्दण झरु दे तुझ्या गात्रातून..
पाहू दे.. तुझ्या तहानलेल्या डोळ्यात माझ प्रतिबीम्ब..
ऐकु दे.. तुझ्या ओठानी घेतलेल माझ नाव..
स्पर्शु दे.. तुझ्या हाताची अस्वस्थ थरथर..
कळु दे.. तुझ्या उतावीळ जाणिवेत माझी ओढ..
हे.. आणि असे कीतीतरी.. क्शण.. जे तुझे एकटीचे.. पण कदाचित माझेही..
No comments:
Post a Comment