अनोळखी वाटानी..
सार आयुष्य भेलकान्डत राहिल..
दिशाहीन..
रक्ताललेली स्वप्ने मरणासन्न अवस्थेत..
अत्रूप्त अव्यक्त..
तू जवळ हवा होतास..
कितीतरी स्वप्न.. खरच मी पाहिली होती..
खरी व्हावीत अशा आशेने नाही.. पण.. भास म्हणुन का होइना, तू सोबत असावास म्हणुन..
तू खरच मला हवा होतास..
मी अशीच जगले..
तोन्डी रन्ग फासल्या बाहुलीगत..
रन्गाच्या पडद्याआड, 'माझ असण' लपवुन टाकल..
मी हसले.. जग हसल.. माझ्यासोबत रडल पण..
पण फक्त खेळापुरत..
'दोन पैशाचा तमाशा' पहाणारे सगळे पुतळे.. घरी जाउन सुखात निजले..
हसर्या डोळ्यात झरणारे दुक्ख.. कधी कुणाला कळालच नाही..
रडायला तुझा खान्दा हवा होता..
सारी वादळ, हसत मी पेलली असती.. तू नुसता हात धरला असतास तरी..
गुदमरलेली स्वप्ने पुन्हा एकदा फुलली असती.. तुझ्या एका स्पर्शाने..
आयुष्याची सान्ज कलेपर्यन्त, आसवान्शी ही लढले असते..
एका शब्दाने तरी म्हणायच होत.. "मी सोबत आहे" म्हणुन..
आता.. स्वताला समजावन्यासाठी तरी शब्द कुठून आणू?
No comments:
Post a Comment